"महाभारत" भारतवर्षातील सनातन वैदिक संस्कृतीचा एक महान ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे अमूल्य रत्नांचे भांडार आहे. यात उपनिषदांचे संपूर्ण सार आले आहे. यात गूढार्थमय ज्ञान विज्ञान आहे, हा धर्मग्रंथ आहेच आणि त्या अनुषंगानुसार यात राजनितिचे दर्शन, कर्मयोग सिद्धांत, भक्तिशास्त्र, अध्यात्मशास्त्र - थोडक्यात याला सर्वशास्त्रसंग्रह म्हणता येईल एवढी याची व्याप्ती आहे.
या ग्रंथात एकूण १८ विभाग आहेत ज्याला पर्व ही संज्ञा दिली आहे. प्रत्येक पर्वात आणखी काही उपपर्वे आहेत. यातील १२ वे पर्व आहे शांतिपर्व. यात तीन उपपर्वे येतात. त्यातील अंतिम पर्व आहे ’मोक्षधर्मपर्व’. या पर्वात १७४ ते ३६५ असे एकूण १९२ अध्याय आलेले आहेत. यात चार पुरुषार्थ, अध्यात्म, नीति, आचार, मानवी जीवनाचे स्वरूप व त्याचे अंतिम उद्दिष्ट, सृष्टी उत्पत्ति व तिचा लय, मानवी देह व त्या अंतर्गत बुद्धि, मन, चित्त याचे स्वरूप, जीव, आत्मा, परमात्मा यांचे स्वरूप, ज्ञान, योग इत्यादिंचे सखोल विवेचन - हे सर्व आले आहे. थोडक्यत मोक्षधर्मपर्व हा ज्ञानकोश आहे.
या भागात १९२ पैकी ४० अध्याय (२४१ ते २८०) आलेले आहेत.
For other Audio-books, pravachan in Marathi, visit - satsangdhara.net